
दिनेश गायके
संस्थापक | संपादक | माध्यम व्यावसायिक | सामाजिक कार्यकर्ते | शिक्षण क्षेत्रातील डिजिटल मीडिया उद्योजक
दिनेश गायके हे माध्यम, पत्रकारिता, जाहिरात आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक आहेत. त्यांनी मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट (MPA) पदवी संपादन करून दिग्दर्शन व प्रोडक्शनमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी देवगिरी महाविद्यालय येथे अध्यापन केले. त्यानंतर UTV, मुंबई येथे व्हिडिओ एडिटर आणि दैनिक लोकमतमध्ये सुमारे सहा वर्षे वेगवेगळ्या कार्याची सेवा दिली. सन २०११ पासून ते छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःची इमेज ऍडव्हर्टाईस नावाने जाहिरात एजन्सी यशस्वीपणे चालवत असून जाहिरात, जनसंपर्क (PR), ब्रँड प्रमोशन आणि मीडिया नियोजनाच्या सेवा देत आहेत. ते "महाराष्ट्र न्यूज टाइम्स" या डिजिटल न्यूज पोर्टलचे तसेच शिक्षण क्षेत्राला समर्पित "ज्ञान सेतू" या डिजिटल न्यूज पेपरचे संस्थापक-संपादक आहेत. याशिवाय "कौशल्य फाउंडेशन" या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. पत्रकारिता, डिजिटल मीडिया, शिक्षण आणि समाजसेवा यांचा समन्वय साधत विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणे हेच दिनेश गायके यांचे ध्येय आहे.